ऊस तोडणी कामगाराची मुलगी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:38 PM2021-02-14T17:38:08+5:302021-02-14T17:38:44+5:30

राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली.

The daughter of a sugarcane harvester went missing | ऊस तोडणी कामगाराची मुलगी बेपत्ता

ऊस तोडणी कामगाराची मुलगी बेपत्ता

Next

राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली.

  श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान नगर येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. रक्षा नावाच्या श्वानाने शोध घेतला. सध्या शीघ्र कृती दलाकडून परिसरात शोधकार्य सुरू आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पीआय हनुमंत गाडे, पीएसआय गणेश शेळके आदींसह राहुरी पोलीस ठाण्याचे व वांबोरी पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Web Title: The daughter of a sugarcane harvester went missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.