दरेवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:49 AM2017-12-06T11:49:18+5:302017-12-06T11:52:01+5:30

दरेवाडी (ता. नगर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटमार केली. दरोडेखोरांनी एका महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला.

Darewadi rioters; Iron rod inserted in the woman's head | दरेवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

दरेवाडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

Next

अहमदनगर : दरेवाडी (ता. नगर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटमार केली. दरोडेखोरांनी एका महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला.
दरेवाडीतील हरि-कृष्णनगर येथे ज्ञानदेव बेरड यांचे किराणा दुकान आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानामागील घराचा दरवाजा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरवाजा उघडल्याचा आवाज आल्याने ज्ञानदेव यांच्या पत्नी दीपाली जाग्या झाल्या. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला. या आवाजाने घरातील लहान मुलेही उठली. त्यामुळे मोठा आरडाओरडा झाला. ते पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना त्यांनी दीपाली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. दरोडेखोरांनी दीपाली यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातल्यामुळे त्यांच्या डोक्यात ११ टाके पडले आहेत. बुधवारी सकाळी भिंगार पोलीस, सरपंच अनिल करांडे यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी ज्ञानदेव बेरड हे बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची लहान मुले, पत्नी व वृद्ध आई, वडील होते. त्यामुळे पाळत ठेऊनच हा दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Darewadi rioters; Iron rod inserted in the woman's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.