संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील "पैस"खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:40 PM2019-07-28T12:40:57+5:302019-07-28T12:41:05+5:30

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील "पैस"खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी "ज्ञानोबा माऊली तुकाराम"चा जयघोषाने नेवासे नागरी दुमदुमुन गेली.

 A crowd of millions of devotees rush to show the pillar of money | संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील "पैस"खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील "पैस"खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Next

अहमदनगरः आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील "पैस"खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी "ज्ञानोबा माऊली तुकाराम"चा जयघोषाने नेवासे नागरी दुमदुमुन गेली. आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त पहाटे प्रवीण गडाख व जयश्रीताई गडाख यांच्या हस्ते माऊलीच्या "पैस" खांबास अभिषेक घालण्यात आला.

श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी पंचगंगा सिडस व जयहरी परिवार, माजी आ. शंकरराव गडाख मित्र मंडळ, रवी तलवार, मारुतराव घुले पतसंस्था, कानिफनाथ मित्र मंडळ, नागेबाबा परिवार यांच्या वतीने फराळ, दूध, पाणी वाटप करण्यात आले.

नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यांतील शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरात ही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले असून, दिवसभरात पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती येथे राहील, असे ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांनी बोलताना सांगितले.

Web Title:  A crowd of millions of devotees rush to show the pillar of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.