परजिल्ह्यात जाऊ इच्छिणा-यांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:36 AM2020-05-05T10:36:44+5:302020-05-05T10:44:01+5:30

शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून एकच गर्दी झाली आहे.

Crowd at the district hospital of the city for fitness certificate of those who want to go to the district | परजिल्ह्यात जाऊ इच्छिणा-यांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात गर्दी

परजिल्ह्यात जाऊ इच्छिणा-यांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात गर्दी

Next

अहमदनगर :  परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर जाण्याआधी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून एकच गर्दी झाली आहे.
राज्यशासनाने परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून खास परवानगी देण्यात आली आहे.  आॅनलाईन अर्ज करून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार परप्रांतीय कामगार, मजूर यासोबतच नागरिकांनाही परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाता येते. तसेच काही कंपन्या, कारखाने, उद्योग सुरू करण्याची परवानगी दिल्याने अनेकांना नोकरीच्या ठिकाणी हजर होण्याचा आदेश मिळालेला आहे. अशांना परजिल्ह्यात जायचे असेल तर जिल्हा रुग्णालयाचे फिटनेस सर्टिर्फिकेट असणे आवश्यक आहे. त्यासाठ जिल्हा रुग्णलयात परजिल्ह्यात जाऊ इच्छिणाºयाची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर त्याला तसे प्रमाणपत्र दिले जाते. असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात एकच झुंबड उडाली आहे. सोमवारीही आठवड्याचा पहिला दिवस होता. त्यादिवशीही मोठी गर्दी होती. आज मंगळवारीही सकाळपासून मोठी गर्दी असल्याचे दिसते.
परजिल्ह्यात नोकरीच्या ठिकाणी जाणे, आपले अडकलेले कुटुंबिय परत आणणे या जिल्ह्यात असलेले परराज्यात जाण्यासाठी आसुसले आहेत. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी रांग होती. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाले.

Web Title: Crowd at the district hospital of the city for fitness certificate of those who want to go to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.