कोविड सेंटरच्या भेटीवरून मंत्री तनपुरेंवर सोशल मीडियावरुन टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:43+5:302021-05-18T04:22:43+5:30

श्रीगोंदा : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील काही कोविड सेंटरना भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ...

Criticism of Minister Tanpur on social media over visit to Kovid Center | कोविड सेंटरच्या भेटीवरून मंत्री तनपुरेंवर सोशल मीडियावरुन टीका

कोविड सेंटरच्या भेटीवरून मंत्री तनपुरेंवर सोशल मीडियावरुन टीका

Next

श्रीगोंदा : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील काही कोविड सेंटरना भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी काही कोविड सेंटरकडे पाठ फिरवली. त्यामुळे सेवाभावी वृत्तीने कोविड सेंटर चालवणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून तनपुरे यांच्यावर टीका केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात १५ कोविड सेंटर सुरू आहेत. रविवारी प्राजक्त तनपुरे हे तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कोळगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, श्रीगोंदा येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार होते. आढळगाव, लोणी व्यंकनाथ, घारगाव, देवदैठण, लिंपणगाव, मढेवडगाव येथेही कोविड सेंटरच्या माध्यमातून रूग्णांना सेवा मिळत आहे. येथील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की, तनपुरे यांनी कोविड सेंटरला भेट द्यावी. पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.

त्यानंतर याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. तनपुरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची कोविड कशी सेंटर दिसली? बाकी कोविड सेंटरला भेट देण्यासाठी वेळ का मिळाला नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

---

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे. मात्र, राज्यमंत्री तनपुरे यांनी काही कोविड सेंटरलाच भेट दिली हे चांगले झाले. मात्र, त्यांना बाकीची कोविड सेंटर दिसली नाहीत का? फक्त दोन्ही काँग्रेस नेत्यांची कोविड सेंटर कशी दिसली? किमान कोविड काळात तरी राजकारण करू नये.

- बाळासाहेब नाहाटा,

माजी सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा

राज्यमंत्री तनपुरे हे कोविडचा आढावा घेण्यासाठी श्रीगोंद्याला आले होते. नगरवरून येता-येता काही कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. याचा चुकीचा अर्थ काढू नये. तसेच राहिलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी त्यांना पुन्हा येण्याची विनंती केली आहे.

- घनशाम शेलार,

प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Criticism of Minister Tanpur on social media over visit to Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.