शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

श्रीगोंदा येथील जात पंचायतमधील हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 8:03 PM

श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले.

श्रीगोंदा : श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले. दोन तरुणींना विवस्त्र करण्यात आले. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार तब्बल ६६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.बायडाबाई भीमा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेश भीमा पालवे, चंदर्या भीमा पालवे, भीमा हनुमंत पालवे, आण्णा बाबू गायकवाड, गंगा बाबू गायकवाड, गंगा हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगा पालवे, अनिल गंगा पालवे, माणिक उत्तम गायकवाड, कान्हू बाबू गायकवाड, राजेश बाजीराव गायकवाड, रामा बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव फुलमाळी, गुलाब सटवा गायकवाड, रामा सटवा गायकवाड, सुनील रामा गायकवाड, बापू गोविंदा गायकवाड, अनिल रामा गायकवाड, भानुदास बापू गायकवाड, सुरेश भीमा गायकवाड, भीमा सटवा गायकवाड, सुरेश उत्तम गायकवाड, रावसाहेब रामा गायकवाड, दगडू रामा गायकवाड, मालन भीमा पालवे, रंगू गंगा पालवे, आक्काबाई रामा गायकवाड, शांताबाई उत्तम गायकवाड, अलकाबाई बापू गायकवाड, मंगल बापू गायकवाड, भामाबाई कान्हू गायकवाड, नरसाबाई बाजीराव फुलमाळी, शांताबाई भीमा गायकवाड, बायडबाई बाजीराव गायकवाड, सर्जेराव बाजीराव गायकवाड, ताराबाई बाबू गायकवाड (सर्व रा. जोशी वस्ती, लिंपणगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.रंगू गंगाराम पालवे यांच्या फिर्यादीवरुन रामा रायबा फुलमाळी, तात्या शिवराम गायकवाड, सायाबा रंगनाथ उमरे, रावसाहेब तात्या गायकवाड, उत्तम रंगनाथ उमरे, शिवराम गंगाराम दिंगरे, आण्णा अश्रू फुलमाळी, भीमा गोपाळ गायकवाड, रामा बाबूराव काकडे, शेटीबा रामा काकडे, शुभाष हनुमंत फुलमाळी, गंगा व्यंकट मले, सुभाष गंगा मले, रामदास गंगा मले, गोविंद बापू मले, सर्जेराव गोविंद मले, राजेश गोविंद पालवे, शालनबाई गोविंद पालवे, रामा बाबू काकडे, साहेबराव महादू काकडे, अनिल साहेबराव काकडे, सुनील साहेबराव काकडे, नेबर व्यंकट फुलमाळी, साहेबराव गुलाब काकडे, उत्तम बाबू काकडे, विनायक नेबर फुलमाळी, कान्हा बापू काकडे, भीमा सटवा गायकवाड, व्यंका बाबू काकडे, बाबासाहेब कान्हू काकडे (सर्व रा. जोशी वस्ती, लिंपणगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींना झाली अटक

श्रीगोंदा साखर कारखान्यावरील जोशीवाडीतील दंगल प्रकरणी सुरेश गायकवाड, अनिल पालवे, माणिक गायकवाड, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, कान्हू काकडे, बायडाबाई फुलमाळी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी बुधवारी जोशीवाडीत ७३ जणांची धरपकड केली. जोशीवाडीत गडबड होऊ नये म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

सलाईन काढून पळाला आरोपी

बुधवारी झालेल्या हाणामारी प्रकरणात २५ जण दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. जखमी झाल्याचा बहाणा करून दवाखान्यात दाखल झालेल्या एका आरोपीने पोलीस अटक करणार असल्याची कुणकुण लागताच सलाईन काढून दवाखान्यातून पलायन केले.

जोशीवस्ती ओस

जोशीवस्तीवर मोठ्या प्रमाणावर नंदीवाले समाज आहे. पोलीस पकडतील या भितीपोटी अनेक जण फरार झाले. त्यामुळे जोशीवस्ती ओस पडली आहे. घरात कोणीही नसल्याने लहान मुले केविलवाणी झाली असून जनावरे चारा, पाण्यावाचून हंबरडा फोडू लागली आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाahmednagar policeअहमदनगर पोलीस