शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:38+5:302021-05-18T04:22:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची अँटिजन ...

Covid test of wanderers in the city for no reason | शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची अँटिजन चाचणी करण्याची मोहीम महापालिका व पोलीस प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

नगरमध्ये महापालिका आयुक्तांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी शहरात मेडिकल, दवाखान्याचे कारण सांगून फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने अँटिजन चाचणीची मोहीम उघडली आहे. सोमवारी दिल्लीगेट, जिल्हा पोलीस अधीक्षक चौक आणि पत्रकार चौकात दुचाकी व चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची चाचणी करण्यात आली. चाचणी करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारीही चौकात उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांकडून अँटिजन चाचणी करण्यात आली असून, पॉझिटिव्ह व्यक्तिंना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाच्या या मोहिमेमुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली असून, ही मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

....

सावेडी उपनगरातील गर्दी कायम

महापालिका व पोलीस प्रशासनाने शहरात कोविड चाचणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या या भागातील रस्त्यांवरील गर्दी ओसरू लागली आहे. मात्र, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, जुना पिंपळगाव रोड, एकविरा चौका, भिस्तबाग चौक, गुलमोहर रोड आदी रस्त्यांवरील गर्दी कायम आहे. कारवाई होत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. शटर बंद करून दुकानेही सुरू असल्याने गर्दी होताना दिसत आहे.

...

फोटो- १७ पोलीस ऑन्टीजेन

Web Title: Covid test of wanderers in the city for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.