महामार्गाच्या कडेला वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्सचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:31+5:302021-05-07T04:22:31+5:30

संगमनेर : संगमनेर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्स, इंजेक्शन व गोळ्यांची पाकिटे उघड्यावर फेकल्याचे गुरूवारी ...

The cost of injection wheels used along the highway | महामार्गाच्या कडेला वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्सचा खच

महामार्गाच्या कडेला वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्सचा खच

Next

संगमनेर : संगमनेर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्स, इंजेक्शन व गोळ्यांची पाकिटे उघड्यावर फेकल्याचे गुरूवारी (दि. ०६) आढळून आले. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील शेताच्या कडेला मोठ्या प्रमाणात हे बायोमेडिकल वेस्ट फेकून दिले आहे.

रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट हे आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचे विघटन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, असा कायदा आहे. मात्र, संगमनेर तालुक्यात हा कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे शेताच्या कडेला मोठ्या प्रमाणात फेकलेल्या बायोमेडिकल वेस्टवरून स्पष्ट होते आहे. संगमनेर महाविद्यालयासमोरून निर्मलनगर परिसरातून काही अंतर पुढे गेल्यानंतर नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग लागतो. तेथे उड्डाणपूल आहे. तेथून नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता आहे. हा रस्ता संपल्यानंतर लगेचच तेथे मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शन व्हाईल्स फेकल्या आहेत. लहान मोठ्या अनेक व्हाईल्सचा खच पडला आहे. कुणी तरी अज्ञात व्यक्तीने अथवा रुग्णालय प्रशासनाने तेथे आणून फेकल्याची शंका आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेचे सावट आहे. हवेतून कोरोना संसर्गाचा प्रसार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा प्रकार धक्कादायक असून शेतकऱ्यांबरोबरच त्यांचे पशुधनाचेही आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची दखल घेत महामार्गाच्या कडेला बायोमेडिकल वेस्ट फेकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घुलेवाडी, गुंजाळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

ही आमची हद्द नाही

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील शेताच्या कडेला मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट फेकून दिले आहे. याबाबत गुंजाळवाडी व घुलेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्या दोघांनीही ही हद्द आमच्या ग्रामपंचायतीची नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे बायोमेडिकल वेस्ट नेमके कोणत्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत फेकले आहे. हे स्पष्ट होऊ शकले नाही. परिसरातील शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता फेकलेले बायोमेडिकल वेस्ट तातडीने उचलणे गरजेचे आहे.

.............

०५ संगमनेर कचरा

Web Title: The cost of injection wheels used along the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.