शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:44 PM

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत ...

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असते. कोरोनाने मात्र सर्वांचेच जगणे बदलून टाकले आहे. कोरोनाने भल्याभल्यांना जमिनीवरही आणले आहे, तर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणाही दिली आहे. माणसाची धडपड काही काळ शांत झाली आणि पुन्हा नव्या उमेदीसह सुरू झाली. माणसाला सर्व काही शिकविणारा ‘कोरोना’ हाच सर्वांचा गुरू बनला आहे. याबाबत जाणकारांना काय वाटते? गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी साधलेला हा आॅनलाईन संवाद.

-------------

निसर्गला गृहित धरू नका, निसर्गाची काळजी घ्यानाती जपा, घरातल्याशी संवाद साधास्वच्छता असेल तर आजार जवळ येत नाहीतप्रत्येकाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावीप्राणीमात्रांवर प्रेम करासंकट मोठे असले तरी मात करता येतेजीवनशैलीमध्ये बदल करता येतोजगात राहणारे सर्व समान आहेतजगण्याची मर्यादा शिकवली

---------

श्रीमद्भगवतगीतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.  गीतेतील ‘करुण’ रसापेक्षा ‘विरह’ रस शिकविण्याची गरज आहे.  पृथ्वीवर असलेले आततायी संपविणे ही काळाची गरज आहे. कोरोनाने अनेकांना जमिनीवर आणले, अनेकांचा अहंकार गळाला. श्रीमंत असो की गरीब सर्वच घरात बसून होते. प्रत्येकाने आपल्या पायरीने आणि निसर्ग नियमाने जगावे, असा संदेश यातून मिळाला. एकांताशिवाय सुख आणि ज्ञान मिळू शकत नाही, हे कोरोनानेच शिकवले आहे.    -अशोकानंद महाराज कर्डिले, निरुपणकार

-------------

कोरोना हे नैसर्गिक संकट नाही. कृत्रिम बॉम्बप्रमाणे हा विषाणू चीनने पसरविला. त्यामुळे हबकून जाण्याची गरज नाही. जमेल तसा या कोरोनाशी मुकाबला करणे, सदैव लढण्यासाठी सिद्ध राहणे गरज बनली आहे. चीनने कोरोना हा विस्तारवादाचे हत्यार म्हणून जगावर सोडले. मात्र भौतिक साधनांचा वापर करून त्याचा बिमोड करण्यासाठी तयार राहणे ही खरी ताकद कोरोनामुळे तयार झाली आहे. माणसाने इतर प्राण्यांचा संभाळ करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, याची शिकवण या संकटातून मिळाली आहे. जमिनीवर आणले, अहंकार गळाला या नकारात्मक बाजू सोडून घाबरून जाण्यात अर्थ नाही.  

 -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, निवृत्त प्राचार्य 

-------------

कोरोनाने माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत जगणे आवश्यक झाले आहे. स्वत:ची काळजी घेऊन जगले पाहिजे. कोरोनाने आर्थिक नियोजन कोलमडले आले. त्यामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत जवळ असला पाहिजे, याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने प्रत्येकाच्या मनावर ताण आला आहे. आपल्यावर निसर्गासारखी एक शक्ती आहे, हेच माणूस विसरला होता. त्याची जाणीव झाली आहे. कोरोनाचे संकट अचानक आल्याने त्याला पेलण्यासाठी भारत देश सुसज्ज नव्हता, हेही आता उघड झाले आहे. जगण्यासाठी सदैव सज्ज पाहिजे, हेही कोरोनाने शिकवले.    

- डॉ. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ