शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघात वाळूउपसा रोखण्यासाठी लोकच उतरली नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:35 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हनुमंतगाव येथे नदीपात्रात ेबेसुमार वाळूउपसा सुरू असतानाही जिल्हा प्रशासन काहीही कारवाई करण्यास धजावत नाही. याबाबत विखे यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे अखेर सोमवारी गावकऱ्यांनीच नदीपात्रात उतरून वाळूउपसा रोखण्याची भूमिका घेतली आहे. परंतु पोलिसांनी चक्क या ग्रामस्थांनाच अडवत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नदीपात्रात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हनुमंतगाव येथे नदीपात्रात ेबेसुमार वाळूउपसा सुरू असतानाही जिल्हा प्रशासन काहीही कारवाई करण्यास धजावत नाही. याबाबत विखे यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे अखेर सोमवारी गावकऱ्यांनीच नदीपात्रात उतरून वाळूउपसा रोखण्याची भूमिका घेतली आहे. परंतु पोलिसांनी चक्क या ग्रामस्थांनाच अडवत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नदीपात्रात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हनुमंतगाव येथे वाळूउपशाचे नियम ढाब्यावर बसवून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला. परंतु तरीही या उपशाबाबत जिल्हा प्रशासनाने पाहणी केली नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे किंवा पालकमंत्री राम शिंदे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. सोमवारी हा वाळूउपसा रोखण्याबाबत ग्रामस्थांनी महसूल अधिकारी व पोलिसांना कळवले. मात्र महसूलने याची कोणतीही दखल घेतली नाही. पोलीस आले तर त्यांनी लोकांवरच दादागिरी सुरू केली. ‘तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करू’, अशी धमकी पोलिसांनी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे येथे उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.