शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कोरोनाविरोधी लढवय्यांचा काँग्रेसकडून गौरव-बाळासाहेब थोरात : प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 4:44 PM

कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून केले आहे.

संगमनेर : कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून केले आहे.   कोरोनाची धग महाराष्ट्रातही येऊन पोहोचली आहे. तुमची, माझी चिंता वाढविणाºया बातम्या सतत कानावर येत आहेत. महाविकास सरकारने पहिल्या दिवसापासून हे संकट गांभीर्याने घेतले आहे. शासकीय सेवेतील विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी या लढाईत सामील असलेले असंख्य हात किंबहुना आपण या लढाईतील खरेखुरे सैनिक आहात.     सण-उत्सवांचा, कौटुंबिक सोहळ्याचा आणि आपल्या व्यक्तिगत सुटीचा विचार न करता महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आपण जोखीम पत्करून काम करीत आहात. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धीराने सामोरे जातात. धोका पत्करून जनतेच्या पाठिशी उभे राहतात. ही शासनव्यवस्था तुमच्यामुळेच आहे. मला ठाऊक आहे आपलेही कुटुंब काळजीत आहे. मात्र, तरीही ही लढाई लढावीच लागणार आहे. आपल्याशिवाय हे युद्ध जिंकणे शक्य नाही. इतरांच्या आरोग्याची काळजी करताना आपण स्वत:लाही जपावे. मास्कचा वापर करावा. सतत हात धुवावेत. सॅनिटायझरचा उपयोग करावा. बैठका-मदतकार्य करताना तीन फूट अंतर ठेवावे. स्पर्श टाळावा आणि इतरही आवश्यक असलेली काळजी घ्यावी, असे आवाहन थोरात यांंनी केले आहे. कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा    आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी गेली आठ दिवस करोनाविरोधातील लढाईत व्यग्र आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि त्यांची टीम, विभागीय आयुक्त दररोज उशिरापर्यंत मैदानात आहेत. या अनपेक्षित लढाईला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व त्यांचे सर्व सहकारी हे १८ तास व्यस्त आहेत. तलाठी समाजाला धीर देतो. कोतवाल त्यांना मदत करीत आहेत. तुम्ही घरदार सोडून राज्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत आहात. त्यांचे कौतुक आहे. असेही थोरात यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या