चला...आपण बदलवू सारे काही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:27 PM2017-08-18T14:27:00+5:302017-08-18T14:27:00+5:30

अभिनव स्पर्धा : जागरूक नागरिक फोरमचा उपक्रम

come..we change all | चला...आपण बदलवू सारे काही!

चला...आपण बदलवू सारे काही!

Next
मदनगर : सण-उत्सवांमध्ये परंपरा जपण्याऐवजी उत्सवांना विकृत स्वरुप आले आहे. गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक शिस्तीची पार वाट लागते. त्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेला जबाबदार न धरता आता मंडळांनीच शिस्त पाळली तर नागरी समस्यांना आळा बसेल, हा उद्देश ठेवून जागरुक नागरिक फोरमतर्फे शहरातील गणेश मंडळांसाठी ‘चला, आपणच बदलवू सारं काही’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे. फोरमचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. गणेशोत्सवामधून उत्साहाऐवजी त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन घडते. त्याला कारवाई हा एकमेव पर्याय नाही, असे मुळे यांचे म्हणणे आहे. विघ्नहर्त्याचे आगमन विघ्न होणार नाही, याबाबत मंडळांनी काळजी घ्यावी, असा उद्देश यामागे आहे.चला आपणच बदलवू या सारं काही या स्पर्धेतील विजेत्यांसाठी ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची पहिली तीन बक्षिसे जाहीर केली आहेत. २५ आॅगस्टपर्यंत मंडळांनी त्यांच्या प्रवेशिका भरून देणे आवश्यक आहे. सहभाग घेण्यासाठी मंडळांनी विविध परवाने घेतलेले असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्वागत झेरॉक्स, जुन्या कोर्टासमोर किंवा संजीव दायमा, प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान चौक रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन सुनील पंडित, कैलास दळवी, बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, राजेश टकले, जया मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, संजय वल्लाकट्टी, राजकुमार जोशी, पुरुषोत्तम गारदे आदींनी केले आहे. -----------स्पर्धेचे निकष अन् शहर सुधारणा (१०० गुण)१)मंडळाने दहा दिवसात प्रभागातील खड्डे बुजविणे२)मंडप टाकताना रस्त्याचे नियम व वाहतुकीची गैरसोय टाळलेली३) त्रास होणार नाही एवढा स्पीकरचा आवाज४)जातीद्वेष कमी करणारे प्रबोधन, व्यसनमुक्तीचा जागर५)वाहतूक नियमनासाठी मंडळाचे गणवेशांमधील स्वयंसेवक नियुक्त६)डिजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा वापर७)प्रभागातील कचºयाची मंडळाकडून साफसफाई८)विसर्जनानंतर मंडपाच्या जागा स्वच्छ, खड्डेमुक्त करणे

Web Title: come..we change all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.