शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

जिल्हाधिका-यांनी आंदोलक ठेकेदारांना हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 7:19 PM

महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले.

ठळक मुद्देकडक शिस्तीचा झटकाबिलांसाठी ठेकेदारांचे बेमुदत उपोषण

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले. त्यामुळे उपोषणार्थी ठेकेदारांना त्यांचे बस्तान रस्त्यावर हलवावे लागले. बिलांबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने ठेकेदारांचे बेमुदत आंदोलन सुरूच होते.महापालिकेतील ठेकेदारांचे तब्बल २५ ते ३० कोटी थकलेले आहेत. त्यापैकी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून केलेल्या कामांची अडीच ते तीन कोटी रुपयांची थकलेली देयके तत्काळ अदा करावीत, अशी ठेकेदारांची मागणी आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही बिले अदा न केल्याने ठेकेदार बुधवारी सकाळीच महापालिकेच्या आवारात उपोषणास बसले. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी हे महापालिकेतील कामकाज उरकून बाहेर निघाले असताना त्यांनी ठेकेदारांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. उपोषण करण्याची ही काही जागा नाही. तुमच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष धोंगडे यांना सांगितले आहे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मी तुमच्याशी चर्चा करणार नाही. महापालिकेचे सुरक्षा रक्षक काय करीत आहेत? अशी विचारणा करीत त्यांनी सुरक्षा रक्षकाला बोलावून त्याचाही समाचार घेतला. आंदोलक महापालिकेत घुसतात आणि तुम्ही काय करता? अशा शब्दात खडसावल्यानंतर सुरक्षा रक्षकाची बोलती बंद झाली. आंदोलन करायचे असेल तर ते थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करा, अशा शब्दात जिल्हाधिका-यांनी ठेकेदारांना ठणकावले. त्यानंतर ठेकेदारांनी त्यांचे बस्तान थेट महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर हलविले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका