शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मुंबईसह १२ महानगरांतील बालके असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:59 PM

रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अण्णा नवथर ।  अहमदनगर : रस्त्यावर भटकणाºया बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनाचा शासनाच्या उद्देशाला मूठमाती मिळाली आहे.  टाटा इन्स्टिट्यूट या संस्थेने मुंबईतील रस्ते, रेल्वेस्टेशन आणि गजबजलेल्या ठिकाणी भटकणा-या बालकांची गणना केली होती़. बालकांच्या गणनेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ हा होता़. बालकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. सर्वेक्षण केलेल्या कार्यकाळात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर आढळून भटकंती करत असल्याची माहिती समोर आली़. ९०५ मुले ही रेल्वेच्या डब्यांमध्ये आढळून आली होती़. यापैकी २५ टक्के मुलांनाच फक्त एक वेळचे जेवण मिळते, असा अहवाल संस्थेने दिला आहे. रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या विकासासाठी सदर संस्थेने शासनाला काही शिफारशी केल्या़. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सन २०१४ मध्ये स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरावर कृतिदल स्थापन करण्याचा निर्णय झाला़ शासनाचे मुख्य सचिव या कृतिदलाचे अध्यक्ष आहेत़. या बैठकीत नागरी भागातील रस्त्यावर राहणाºया बालकांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली़. यासंदर्भात महापालिकांनी १५ दिवसांत कृती दल स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला होता़.  तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने महापालिकांकडून मागविला होता.  परंतु, अहमदनगरसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, सांगली मिरज कुपवाड, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई विरार, परभणी या महापालिकांनी रस्त्यावरील भटकणाºया मुलांच्या पुनर्वसनासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही.  त्यामुळे शासनाने सदर महापालिकांना कार्यवाही करण्याबाबत स्मरणपत्र पाठविले आहे.काय सांगतो अहवाल नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या काळात झालेल्या सर्वेक्षणात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये रस्त्यावर राहणाºयांमध्ये ३० टक्के मुली, ६५ टक्के मुले कुटुंबासोबत आधाराच्या शोधात, रस्त्यावर राहणा-यांमध्ये २५ टक्के मुले रोजगार करतात. तर १५ टक्के मुले व्यसनाधीन असल्याचे आढळून आले आहे.दर ५ पैकी २ मुले अत्याचाराचे शिकाररस्त्यावर राहणा-या दर पाच मुलांपैकी २ मुले मानसिक, शारीरिक अत्याचाराचे शिकार होत असल्याचे संस्थेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन