महावितरणचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव - प्राजक्त तनपुरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 01:25 PM2021-03-12T13:25:01+5:302021-03-12T13:25:10+5:30

महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केद्र सरकारचा डाव आहे.

Centre's move to privatize MSEDCL - Prajakta Tanpure | महावितरणचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव - प्राजक्त तनपुरे 

महावितरणचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव - प्राजक्त तनपुरे 

Next

राहुरी : महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा केद्र सरकारचा डाव आहे. भविष्यामध्ये अदानी-अंबानी यांच्याकडे ही कंपनी गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकरी हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी  सबस्टेशनवर मंत्री तनपुरे बोलत होते.

तनपुरे म्हणाले, ऊर्जा विभागात काम करणं हे खरंतर आव्हानात्मक होतं. तरी शेतकऱ्यांची सेवा करता यावी म्हणून हे ऊर्जा खातं हे मी घाबरत- घाबरत घेतले. राज्यात महावितरण कंपनीची ६० हजार कोटी थकबाकी आहे. त्यामुळे  महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. 

शेतकऱ्यासाठी नवीन ऊर्जा धोरण आणले आहे. थकीत शेतकऱ्यांच्या वीज बील थकबाकीत सवलत देऊन दंड माफ  केला. या योजनेमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती देऊन ६५ वीजबिलात माफी दिली. आगामी काळात आपल्या मतदार संघात एकही ट्रान्सफार्मर ओहरलोड राहणार नाही याची खात्री देत अधिकाधिक कामे करून विकासाचा डोंगर उभा करू, असेही तनपुरे म्हणाले.  शेतकरयांनी आपले वीज बिल भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, नामदेव म्हसे, केशव बेरड, विकास तरवडे, सरपंच संजय खरात, डॉ.राजेंद्र बानकर, नंदकुमार तनपुरे, संतोष धसाळ, धीरज पानसंबळ, बन्सी औटी, बाबासाहेब तोडमल, ईश्वर कुसमुडे, सचिन ठुबे, दादासाहेब हापसे, बाळासाहेब देशमुख, शिवाजी राजदेव, राजेंद्र मोरे, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड,  मंगेश गांगुर्डे, नितीन मुरकुटे, रविंद्र आढाव, संभाजी पालवे, प्रकाश देठे, माऊली पवार, अमोल वाघ, विठ्ठल मोकटे  उपस्थित होते.

 

Web Title: Centre's move to privatize MSEDCL - Prajakta Tanpure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.