शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

बिबट्या देतोय पिंज-याला हुलकावणी;  शेतक-यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 4:16 PM

कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.

कोल्हार  : कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.मानवाने जंगली प्राण्यांच्या हक्काच्या निवा-यावर अतिक्रमण केले. त्यामुळे जंगलातील ही श्वापदे मानवी वस्तीकडे वळली. प्रवरा पट्ट्यात नगर जिल्ह्यात बहुसंख्येने साखर कारखानदारी आहे. बिबट्यांना येथे मुबलक पाणी, लपण्यासाठी उसाचा आडोसा व शेतक-यांचे पशुधन मिळत आहे. सर्व सुविधा मिळत असल्याने बिबटे उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत. येथेच प्रजनन होत असल्याने बिबट्यांची संख्या आता वाढतच आहे.बिबटे पिंज-यात जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडे केवळ एकच उपाय आहे. पिंजºयात भक्ष्य ठेवून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा करणे. मात्र आता परिसरातील चतुर बिबटे वनखात्याने पिंज-यात ठेवलेल्या भक्ष्यास बळी पडत नसल्याने बिबटे जेरबंद होण्याचे प्रमाण घटले आहे.भगवतीपूर येथील थडी फाटा परिसरात बिरोबा मंदिराजवळ लावलेल्या पिंजºयात अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्यास असलेल्या तीन बिबट्यापैकी एकही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे आता वनखात्याने येथील पिंजराच अन्यत्र हलविला आहे. येथे रोजच पशुधन व कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. एकाच वेळी तीन बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाल्याने त्याच्या दहशतीने सायंकाळी सात नंतर शेतकरी बाहेर पडत नाहीत. त्यात रात्री ११ नंतर वीज येते. दिवसभर वीज नसल्याने शेतीमध्ये पिकांना पाणी देता येत नाही, असे भगवतीपूरचे माजी उपसरपंच बी. के. खर्डे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्या