शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

तलाठी भरतीवरून चुकीचे आरोप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा 

By चंद्रकांत शेळके | Published: January 08, 2024 6:55 PM

राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे.

अहमदनगर : राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू, अशा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.

तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून होत आहे. निकालातील गुणांत मोठी तफावत आहे. अनेक विद्यार्थ्यांना २०० पैकी २०० हून अधिकचे गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण २०० पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या, त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे. ते काही नवीन नाही. ४८ विद्यार्थ्यांना २०० पैकी जास्त गुण मिळाले, हे आम्ही जाहीर केलेले आहे. लपवून ठेवले नाही. गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरीटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल.

मात्र, दुसरीकडे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचे बेछूट आरोप सुरू आहेत. भरतीसाठी सरकारने पैसे घेतल्याचे आरोप काहीजणांनी केेले. त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत. सर्व खुलासे आम्ही देऊ. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, आरोप चुकीचे आढळले, तर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांच्या डोक्यावर परिणामशिवसेनेचे खासदार सुनील राऊत यांच्या आरोपांबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. खासगी आरोप करून त्यांनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचीही यादी आम्हाला काढावी लागेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील