नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:01 PM2020-10-16T17:01:28+5:302020-10-16T17:02:30+5:30

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल, पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

In case of natural calamity, the state government should support the farmers and the Center should also help: Balasaheb Thorat | नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात

Next

संगमनेर :  परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल, पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

  केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करतील, असेही थोरात म्हणाले.

Web Title: In case of natural calamity, the state government should support the farmers and the Center should also help: Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.