शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

किर्ती जाधवच्या मृत्यू प्रकरणी रहाट पाळणा चालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:29 AM

हरेगाव : येथील मतमाऊली यात्रौत्सवादरम्यान रहाट पाळण्याच्या लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना विजेचा धक्का बसल्याने किर्ती निलेश जाधव (रा.सावेडी, अहमदनगर) या २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत सखोल वृत्त प्रकाशित करताच श्रीरामपूर पोलिसांनी जाधव यांच्या मृत्यूस जबाबदार धरुन रहाट पाळणा चालकांसह बेलापूर इंडस्टीजचा मॅनेजर अशा तिघाजणांवर गुन्हा दाखल केला.श्रीरामपूर तालुका ...

हरेगाव : येथील मतमाऊली यात्रौत्सवादरम्यान रहाट पाळण्याच्या लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना विजेचा धक्का बसल्याने किर्ती निलेश जाधव (रा.सावेडी, अहमदनगर) या २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत सखोल वृत्त प्रकाशित करताच श्रीरामपूर पोलिसांनी जाधव यांच्या मृत्यूस जबाबदार धरुन रहाट पाळणा चालकांसह बेलापूर इंडस्टीजचा मॅनेजर अशा तिघाजणांवर गुन्हा दाखल केला.श्रीरामपूर तालुका पोलिसांनी बेकायदा रहाट पाळणे चालविणे, खासगी जागेत मोठे धोकादायक रहाट पाळणे उभारणे, मनुष्याच्या जीवित हानीस जबाबदारी असणे अशा विविध कलमांखाली या आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. हरेगाव दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार भैलुमे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.९ सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रेत रात्री ९़३० ते १० वाजण्याच्या दरम्यान मयत किर्ती जाधव या रहाट पाळण्यातून खाली उतरत असताना त्यांना विजेचा धक्का बसला होता. विजेचा शॉक लागल्यानंतर जाधव यांना उपचारार्थ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच जाधव यांची प्राणज्योत मालवली. घटनेच्या दुस-या दिवशी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी मयताचे शवविच्छेदन केले. जाधव यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. दरम्यान मयताचा व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मयत किर्ती जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी प्रारंभी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी महंमद सलीम अब्दुल सत्तार शेख (रा. वार्ड नं २ श्रीरामपूर), सईद (पूर्ण नाव माहित नाही, रा. शाहपूर, जिल्हा पालघर), पापाभाई पठाण (बेलापूर इंडस्ट्रीजचा मेनेजर, रा. हरेगाव) अशा तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.