The bus driver was beaten and robbed of money | बसचालकाला मारहाण करून पैसे लुटले

बसचालकाला मारहाण करून पैसे लुटले

ट्रकचालकाला मारहाण करून पैसे चोरले

अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी शिवारात चोरट्यांनी ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकडील ११ हजार ९०० रुपये चोरून नेले. ४ मार्च रोजी रात्री ९ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शेख अमजत शेख अहमद (रा. हरसूल, मध्यप्रदेश) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे पुढील तपास करत आहेत.

मोटारसायकल चोरली

अहमदनगर : केडगाव येथील जगन्नाथनगर येथून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. २ ते ३ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी गणेश महादेव भोसले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल विखे हे पुढील तपास करत आहेत.

सौर ऊर्जा संच चोरला

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील सरोळा येथील शेतातून चोरट्याने सौर ऊर्जेचा संच चोरू नेला. २ ते ३ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात बाबासाहेब किसन डुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भागवत हे पुढील तपास करत आहेत.

वीजपंप चोरला

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतातून चोरट्यांनी शेतकऱ्याचा सात हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरून नेला. २७ जानेवारी ते २ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सुरेश लक्ष्मण मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक देवकाते पुढील तपास करत आहेत.

Web Title: The bus driver was beaten and robbed of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.