श्रीरामपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:34+5:302021-04-14T04:19:34+5:30

शहरातील संजय रुपटक्के यांचे परिचित असलेले पुजाजी केदारी यांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यामुळे केदारी यांनी रुपटक्के यांच्याकडे त्याकरिता ...

The black market of Ramdesivir in Shrirampur | श्रीरामपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार

श्रीरामपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार

Next

शहरातील संजय रुपटक्के यांचे परिचित असलेले पुजाजी केदारी यांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यामुळे केदारी यांनी रुपटक्के यांच्याकडे त्याकरिता ४० हजार रुपये मदतीची मागणी केली. कोल्हार येथील एक व्यक्ती दोन इंजेक्शन केदारी यांना उपलब्ध करून देणार होता. त्यावरून रुपटक्के तसेच कार्यकर्ते गणेश जायगुडे व सोमनाथ कदम हे शहरातील साखर कामगार रुग्णालयाजवळ आले. तेथे केदारी यांचे कुटुंबीय इंजेक्शन विक्रेत्याच्या प्रतीक्षेत उभे होते.

भाजप कार्यकर्त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. थोड्याच वेळात दोन पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. ठरल्याप्रमाणे कोल्हार येथील एक व्यक्ती दुचाकीवर त्याच्या एका सहकाऱ्यासमवेत तेथे आली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली. त्यात कोल्हार येथील एका व्यक्तिला पकडण्यात कार्यकर्त्यांना यश आले. बार्शी (जि. सोलापूर) येथील एक इसम मात्र फरार झाला. पकडलेली व्यक्ती शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला असून, तेथील डॉक्टरांनीच आपल्याला इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्त्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी पाचारण केल्याचे समजते. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Web Title: The black market of Ramdesivir in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.