शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पारा ४० च्या पुढे, तरीही वाढतेय रोहयो मजुरांची संख्या

By चंद्रकांत शेळके | Published: May 08, 2024 8:37 PM

आठवडाभरात वाढले १० हजार मजूर : निवडणुकीचा उपस्थितीवर परिणाम नाही

अहमदनगर : इतर वेळी रोजगार हमीच्या कामांवर मजुरांचा दुष्काळ असतो. मात्र, यंदा दुष्काळात रोहयोवरील मजूर कमालीचे वाढले आहेत. एकाच आठवड्यात तब्बल १० हजार मजूर वाढलेले असून, सध्या जिल्ह्यातील २१०४ कामांवर १८ हजार ५४२ मजूर काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा कोणताही परिणाम मजूर उपस्थितीवर जाणवत नसल्याचे यातून दिसत आहे. 

रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामांतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. फळबाग लागवड, रस्त्यांची कामे, गायी गोठ्याची कामे, वृक्षलागवड, घरकुलाची कामे, शोषखड्डे, आदी कामे ग्रामीण भागात रोहयोच्या माध्यमातून केली जातात. या योजनेतून १०० दिवसांच्या रोजगाराची हमी शासनाकडून दिली जाते.

मजुरांनी ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी नोंदवल्यानंतर मजुरांना सरकारी यंत्रणेतून जवळची कामे उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही एकच मजुरी दिली जाते. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे लोक प्रचारात दंग असतील. परिणामी रोहयोची मजूर संख्या घटेल, असे वाटत होते. मात्र, लोकांनी निवडणुकीकडे साफ दुर्लक्ष केले असून, रोजगाराला पसंती दिल्याचे दिसते आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात मजूर संख्या १८ हजार ५०० पर्यंत गेली आहे.

मागील वर्षीपेक्षा दुपटीने वाढले मजूरसध्या शेतकऱ्यांची शेतातील कामे आटोपली आहेत. त्यामुळे गावोगाव कामाची मागणी वाढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कामाची मागणी वाढते. परंतु यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात मजूर संख्या ९ हजारांपर्यंत होती. ती आता १८ हजारांच्या पुढे गेली आहे.

५० टक्के मजूर एकट्या जामखेड तालुक्यातीलचालू आठवड्यात जिल्ह्यातील २१०४ कामांवर १८ हजार ५४२ मजुरांची उपस्थिती आहे. यात ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ९ हजार ७९९ मजूर एकट्या जामखेड तालुक्यात आहेत. त्यानंतर शेवगाव तालुक्यात २ हजार ६९५, संगमनेरमध्ये १०८६, तर पारनेर तालुक्यात १ हजार १८७ मजूर कार्यरत आहेत.

२९७ रुपये मजुरीरोहयोवरील मजुराला सध्या २९७ रुपये मजुरी मिळते. सध्या शेतीची कामे संपल्याने रस्त्याची, घरकुल, शोषखड्डे, फळबागा अशी कामे सुरू आहेत.

प्रचाराकडे पाठलोकसभा निवडणुकीमुळे यंदा मजूर प्रचाराकडे वळतील. परिणामी रोहयोच्या कामांवरील उपस्थिती घटेल, अशी शक्यता होती. मात्र, निवडणूक जशी जवळ येईल, तशी रोहयोच्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर