कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:13 PM2020-09-16T13:13:32+5:302020-09-16T13:14:12+5:30

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

Banning onion exports is a betrayal of farmers by the central government - Lahu Kanade | कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

Next

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्येही काँग्रेसच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

यावेळी आमदार कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,'आपला देश हा श्रद्धाळू लोकांचा देश आहे. त्यामुळे मंदिर खुली केली तर गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या समूह संसर्ग सुरू झाला आहे. अशा काळात मंदिरे खुली करून पुन्हा लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणे योग्य होणार नाही. त्यामुळे श्रद्धाळूनी श्रद्धा घरातल्या घरात व्यक्त करावी, असे माझ्यासारख्याला वाटते. आम्ही देखील श्रद्धाळू आहोत. पण आपल्याला हा निर्णय घेण्यासाठी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. करोनासंसर्ग जेव्हा कमी होईल, हळूहळू रुग्ण संख्या कमी होत जाईल, परिस्थिती आटोक्यात येईल, तेव्हा या सर्व गोष्टी खुल्या होणारच आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध पक्ष, संघटना यांच्याकडून मागणी करण्यात येत असून यासाठी भाजपने राज्यभर आंदोलने केली. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मंदिर उघडण्याबाबत अद्याप संयम बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच या निर्णयाला वेळ लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही तालुके, शहर स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय तेथील नागरिक घेऊ लागले आहे. आमदार कानडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या मतदारसंघातील श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये ही सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. याबाबत कानडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'लोक स्वतःहून बंद करीत असतील तर आम्हाला त्याबाबत काही म्हणायचे नाही. पण बंदची बळजबरी करू नये. कारण मोदी सरकारच्या लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेचे अगोदरच तीन तेरा वाजले आहेत. जीडीपी हा इतिहासात पहिल्यांदा एवढा खाली आला आहे. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने घाईघाईने केलेला लॉकडाऊन आहे. आता आपली जबाबदारी ही अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आहे. सरकारने अनलॉक सुरू केले. त्यामुळे हळूहळू हातावर पोट असणारी माणसे पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर या माणसांच्या अडचणीत भर पडेल. त्यामुळे उद्योग धंदे चालू राहणे गरजेचे आहे. कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांना जगता आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बंदबाबत कोणतीही जबरदस्ती करू नये,' असेही ते म्हणाले.

Web Title: Banning onion exports is a betrayal of farmers by the central government - Lahu Kanade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.