Babysitter bang in the Ashei Boudruk area | आश्वी बुद्रूक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
आश्वी बुद्रूक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे उचलून नेले. ही घटना सीसीटीवी कॅमे-यात कैद झाली आहे.
दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी, नागरिकाच्या जीवीताला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तत्काळ या परिसरात पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी प्रगतशील शेतकरी भगवानराव इलग, शिवाजी इलग, रवींद्र बालोटे, विनायकराव बालोटे, अनिस शेख, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, गणेश मुनमुने, अनिल बालोटे व ग्रामस्थांनी केली आहे. 


Web Title: Babysitter bang in the Ashei Boudruk area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.