बबनराव पाचपुते यावेळी त्याच चिन्हावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:25 IST2019-10-01T14:25:01+5:302019-10-01T14:25:30+5:30
सगळ्या शक्यता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनुराधा नागवडे यांची भाजपच्या उमेदवारीच्या शक्यता संपुष्टात आली. राहुल जगताप यांच्याकडेही आता राष्ट्रवादी हाच पर्याय आहे.

बबनराव पाचपुते यावेळी त्याच चिन्हावर
अहमदनगर: सगळ्या शक्यता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनुराधा नागवडे यांची भाजपच्या उमेदवारीच्या शक्यता संपुष्टात आली. राहुल जगताप यांच्याकडेही आता राष्ट्रवादी हाच पर्याय आहे.
पाचपुते यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही. नागवडे व राहुल जगताप हे दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने पाचपुते यांनाच संधी दिली आहे. पाचपुते हे प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर लढतात असा त्यांचा इतिहास आहे. मात्र यावेळी ते सलग दुसºयांदा ‘कमळ’ या चिन्हावरच लढतील हे आता स्पष्ट झाले. नागवडे यांना आता काँग्रेस आघाडीकडूनच उमेदवारीची संधी मिळू शकते. राहुल जगताप यांनाही राष्टÑवादी हाच पर्याय आता उपलब्ध आहे.