शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

नगरचा अझीम काझी महाराष्ट्र क्रिकेट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:03 PM

सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ११० च्या रनरेटने धावा फटकावणारा नगरचा अष्टपैलू खेळाडू अझीम नझीर काझी याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे़ 

अहमदनगर : सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ११० च्या रनरेटने धावा फटकावणारा नगरचा अष्टपैलू खेळाडू अझीम नझीर काझी याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे़ भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्यावतीने आयोजित विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना २४ सप्टेंबर रोजी होणार आहे़ फेबु्रवारी-मार्च २०१९ मध्ये झालेल्या सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत काझीने महाराष्ट्राकडून खेळताना ११० च्या रनरेटने धावा फटकावल्या होत्या़ तसेच ६ विकेटही घेतल्या होत्या़ काझी डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज आहे़ गुजरातविरुद्धच्या सामन्यात काझीने २९ चेंडूत उत्तुंग तीन षटकार ठोकत नाबाद ३९ धावा करुन महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता़ एकदिवसीय मालिकेत काझी प्रथमच खेळणार आहे़ काझी हा यापूर्वी महाराष्ट्राच्या १९ व २३ वर्षाखालील संघातून खेळला आहे़ फेबु्रवारीमध्ये त्याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली होती़ त्यानंतर आता तो एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करीत आहे़ २५ वर्षीय काझी नगरमधील हुंडेकरी स्पोर्टस् अकॅडमीमध्ये सराव करीत आहे, अशी माहिती अकॅडमीचे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांनी दिली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर