नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक्टरचोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:26 PM2018-08-04T15:26:00+5:302018-08-04T15:26:13+5:30

नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीक बावडकर पट्टीतील टॅक्टर चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर चारचाकी वाहन सोडून पसार झाले.

The attempts of tractor to be crippled due to the alert of the citizens | नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक्टरचोरीचा प्रयत्न फसला

नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक्टरचोरीचा प्रयत्न फसला

Next

मिरजगाव : नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीक बावडकर पट्टीतील टॅक्टर चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर चारचाकी वाहन सोडून पसार झाले.
शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बावडकर पट्टीत राहणा-या यशोदाबाई बावडकर यांना टॅक्टर चालू झाल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेरची चाहूल घेतली. लाल रंगाची कार व टॅक्टर सुरु करताना एक व्यक्ती दिसल्यावर त्यांनी हा प्रकार मुलगा राजेंद्र बावडकर यांना सांगीतला. तोपर्यंत चोरट्यांनी ट्रॅक्टर चालू होत नसल्याने त्यांच्याजवळील बॅटरी टाकून टॅक्टर घेऊन नगरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान राजेंद्र यांनी मोबाईलवरून संपत बावडकर, पांडुरंग बावडकर, नंदू बावडकर, सचिन बावडकर यांना ही हकीगत सांगीतली. त्यानंतर या सर्वांनी वाहनातून नगरच्या दिशेने पाठलाग सुरू केला. या प्रकाराची माहिती मांदळीचे सरपंच धनेश गागंर्डे यांनाही दिल्यानंतर ते तरूणांना घेऊन रस्त्यावर थांबले. या पाठलगादरम्यान लाल रंगाची कार कठीणदेवाजवळ दिसली. बावडकर यांना मात्र टॅक्टर दिसला नसल्याने ते पुढे गेले. मांदळीजवळ ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी ट्रॅक्टर अंगावर घातला. या सर्वानी चोरट्यांच्या दिशेने दगड फेक केल्याने चोरटा पळाला. याच वेळी मागून लाल चारचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लोकांचा जमाव पाहून हा चोरट्यानेही धूम ठोकली. परिसरात शोधाशोध केली, परंतू ते सापडले नाहीत.

Web Title: The attempts of tractor to be crippled due to the alert of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.