समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यालगत स्कुटी चालविण्याचा सराव करत होत्या. याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या पाठीमागे पल्सर दुचाकीद्वारे येऊन गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना ते गंठण हाती लागले नसल्याने त्यांनी तिथून धूम ठोकली.
महिलेच्या गळ्यातील सोने ओरबाडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:15 AM