Arrival of rain in Akole taluka | अकोले तालुक्यात पावसाचे आगमन

अकोले तालुक्यात पावसाचे आगमन

अकोले : तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. शहरपरिसरासह तालुक्यात सर्वदूर मंगळवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी रात्रभर बरसल्या. अकोलेत २७, कोतुळ येथे २६ तर पांजरे येथे १९ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद बुधवारी सकाळी झाली. तर रतनवाडी येथे यंदाच्या मोसमात आतापर्यंत ४७ मिलिमिटर पाऊस पडला आहे.
अकोलेत रोहिणीनक्षञ बरसू लागले आहे. चार दिवसांनी मृग नक्षञ मान्सूनचा पाऊस घेवून तालुक्यात पश्चिम घाटमाथ्यावर येवून धडकेल? असा अंदाज आहे. आजमितीस भंडारदरा धरणात ३ हजार ७६७ दशलक्षघनफुट तर निळवंडेत ३ हजार ५५२ दशलक्षघनफुट इतका पाणीसाठी आहे.
मंगळवारी झालेली पावसाची नोंद व कंसात यंदा आजपर्यंत बरसलेला पाऊस मिलिमीटर मध्ये: भंडारदरा-१७(२९), घाटघर-१३(१५), रतनवाडी-१३(४७), पांजरे-१९(२६), वाकी- १७(२२), निळवंडे- १२, अकोले- २७, कोतुळ- २६, विरगाव- १०, समशेरपूर- १६, राजूर- १३, साकीरवाडी-०९, ब्राम्हणवाडा- १६.
 

Web Title: Arrival of rain in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.