तेलकुडगावातील दानपेटी फोडणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:21 AM2021-01-23T04:21:55+5:302021-01-23T04:21:55+5:30

नेवासा : तालुक्यातील तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पसार झालेला आरोपी कुकाणा दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केला ...

Arrested in Telkudgaon | तेलकुडगावातील दानपेटी फोडणाऱ्यास अटक

तेलकुडगावातील दानपेटी फोडणाऱ्यास अटक

Next

नेवासा : तालुक्यातील तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पसार झालेला आरोपी कुकाणा दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केला आहे.

६ जानेवारीला चोरांनी तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे १७ हजार रूपयांची चोरी केली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुरुवारी (दि.२१) सांयकाळी खबऱ्यामार्फत या घटनेतील संशयित आरोपी पाचुंदा शिवारात असल्याची माहिती कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा दूरक्षेत्रातील हे. कॉ. बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस नाईक राजेंद्र केदार, पो. कॉ. अंबादास गीते, नितीन भताणे, अमोल बुचकूल यांचे पथकाने पाचुंदा शिवारात सापळा लावून संशयित आतीश लाजरस शिंदे (वय २३, रा. पाचुंदा, ता. नेवासा) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. राजेंद्र केदार करीत आहेत.

Web Title: Arrested in Telkudgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.