आरोळे यांचा शासनाकडून गौरव व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:20+5:302021-04-23T04:23:20+5:30

रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील नि:स्वार्थ भावनेच्या रुग्णसेवेचा वसा घेऊन त्यांचे चिरंजीव डॉ. रवी ...

Arole should be glorified by the government | आरोळे यांचा शासनाकडून गौरव व्हावा

आरोळे यांचा शासनाकडून गौरव व्हावा

Next

रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील नि:स्वार्थ भावनेच्या रुग्णसेवेचा वसा घेऊन त्यांचे चिरंजीव डॉ. रवी आरोळे कार्यरत आहेत. जामखेड तालुक्यात ग्रामीण विकास प्रकल्पाच्या जुलिया हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची रुग्णसेवा सुरू आहे. सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी लाखो रुपये खर्च येत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करावी लागत आहे, तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्णांचे कुटुंबीय हॉस्पिटलचे बिल भरता भरता कर्जबाजारी झाले आहेत, तर कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीचे मृतदेह देखील बिल न भरल्याने हॉस्पिटल अंत्यसंस्कारासाठी देत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जामखेड येथील आरोळे पॅटर्न या अनागोंदीत सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरला आहे. या निवेदनावर अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, कॉम्रेड बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Web Title: Arole should be glorified by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.