संगमनेर तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:21 AM2021-07-28T04:21:31+5:302021-07-28T04:21:31+5:30

दंडकारण्य अभियानाच्या माध्यातून सोमवारी (दि. २६) तालुक्यातील देवगड (हिवरगाव पावसा) येथे दूध उत्पादक संघ आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट, देवगड ...

Arboriculture culture started growing in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस लागली

संगमनेर तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस लागली

Next

दंडकारण्य अभियानाच्या माध्यातून सोमवारी (दि. २६) तालुक्यातील देवगड (हिवरगाव पावसा) येथे दूध उत्पादक संघ आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, साहेबराव गडाख, मोहन करंजकर, माणिक यादव, विलास वर्पे, ॲड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, अण्णासाहेब राहिंज, संतोष मांडेकर, डॉ. गंगाधर चव्हाण, राजेंद्र देशमुख, अजित देशमुख, मथाजी पावसे, सुभाष गडाख, भाऊसाहेब जाधव, यादव पावसे, अण्णासाहेब येरमल, डॉ. प्रमोद पावसे, डॉ. विजय पावसे, गणपत पावसे, रामनाथ गडाख, बाबासाहेब पावसे, उत्तम जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दंडकारण्य अभियान राबविले जाते आहे. तालुक्यातील डोंगरांवर, मोकळ्या जागेत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. वृक्षसंवर्धन आता प्रत्येकाची जबाबदारी असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून यात सहभागी होण्याचे आवाहन देखील देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मोहन करंजकर यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. जोंधळे यांनी केले.डॉ. पावसे यांनी आभार मानले.

Web Title: Arboriculture culture started growing in Sangamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.