शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

स्वत:चे पाप झाकण्यासाठी शिवसेनेवर गरळ : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:23 AM

केडगाव हत्याकांड, पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील स्वत:चे पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला.

अहमदनगर : केडगाव हत्याकांड, पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील स्वत:चे पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या खुलाशात स्थानिक नेत्यांनी शिवसेनेवर गरळ ओकली. जगताप पिता-पुत्रांनी त्यांचे नेते शरद पवार, माजी आमदार दादा कळमकर आणि पक्षालाही फसविले आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर या प्रकाराची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली. स्थानिकांना नोटिसा बजावल्या होत्या. याचा खुलासा करताना नगरसेवकांनी शिवसेनेच्या त्रासाला कंटाळून त्यांना रोखण्यासाठीच भाजपला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राठोड म्हणाले, शिवसेनेचा कोणता त्रास त्यांना झाला? पैसे घेऊन त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्यानंतर त्यांनी कैलास गिरवले यांना झोपेतून उठवून आणले. त्यामुळे त्यांचा खूनही जगतापांनीच केला. जगतापांचाच शहराला त्रास आहे. कै. बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येलाही कोण जबाबदार आहे, हे जनतेला माहिती आहे. एमआयडीसीमध्ये दादागिरी, व्यापाऱ्यांना जाच हे कोण करतेय, हे सांगायची गरज नाही. शिवसेनेवर आरोप होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाहीत. महापौर निवडणुकीत त्यांनी पैसे घ्यायचे आणि आरोप शिवसेनेवर करायचे. जगतापांनी राजकारणातील नीतीमूल्येच खलास केली आहेत. ते कोणत्याही पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहिले नाहीत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी मिळाला नाही, हे सांगून जनतेचीही ते दिशाभूल करीत आहेत. शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे आधी सांगणारे आ. संग्राम जगताप आता शिवसेनेच्या त्रासाला कंटाळून भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगत आहेत. ही त्यांच्यातील विसंगती असल्याचे प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले.केडगाव हत्याकांडाचा तपास रखडलाभाजपपेक्षा राष्ट्रवादीच्या दबावामुळेच केडगाव हत्याकांडाचा तपास रखडला आहे. आजपर्यंत आम्ही निवडणुकीत व्यस्त होतो. आता तपास जलदगतीने व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तपास योग्य दिशेने व्हावा, हाच आमचा प्रयत्न राहील, असे राठोड म्हणाले.कर्डिले चालवितात तीन पक्षकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असे तिन्हीही पक्ष आ. शिवाजी कर्डिले चालवितात, हे महापौर निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आर्थिक तडजोडीतून त्यांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली. पक्षाचे प्रामाणिक काम करणारे दादा कळमकर यांना सुद्धा त्यांनीच अडचणीत आणले. त्यांचे राजकीय आयुष्य बरबाद करण्याचा सोयºया-धायºयांचा डाव उघड झाला आहे. जे शरद पवार यांना फसवितात, ते जनतेच्या डोळ््यात धूळ फेकणारच, हे खुलाशावरून सिद्ध झाले आहे, असे राठोड म्हणाले.वजनदार पाकिटांमुळे ते चौघे भाजपाला मिळालेबहुजन समाज पक्षाचे चारही नगरसेवक हे आमचेच कार्यकर्ते होते. प्रभाग दहामध्ये त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्या भागात शिवसेनेच्या चिन्हावर मतदान होत नसल्याने त्यांनी बसपाचा आधार घेतला. मात्र निवडणूक लढविताना त्यांनी आम्हाला पाच वर्षे शिवसेनेसोबत राहण्याचे, महापौर निवडणूक आणि सभापती निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य करण्याचे, शिवसेनेसोबत गटनोंदणी करणार असल्याचे बॉण्डवर लिहून दिले होते. मात्र भाजपच्या वजनदार पाकिटांमुळे ते भाजपसोबत गेले. सचिन जाधव हे काही आमचे कट्टर नव्हते. कार्यकर्ते सगळेच सारखे असतात, असे सांगत राठोड यांनी बसपाच्या चौघांनी लिहून दिलेले बॉण्ड पत्रकारांना दाखविले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना