अमिताभ, सचिनला बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:32 PM2017-08-21T16:32:08+5:302017-08-21T16:32:08+5:30

amitabh,sachin,brand,ambasider proposal cancell | अमिताभ, सचिनला बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर रद्द

अमिताभ, सचिनला बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर रद्द

Next
ठळक मुद्देसाई संस्थान : साईभक्त हेच बँ्रड अँबेसिडर
िर्डी :साईबाबा संस्थानने अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर यांना बँ्रड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर अधिकृतपणे रद्द केला.साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त साई संस्थानने प्रचार व प्रसारासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला होता. या नेमणुकीस साईभक्तांमधून तीव्र विरोध होत होता. तसेच यावर प्रचंड टीका झाली होती. अखेर हा ब्रँड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव संस्थानने अधिकृतपणे रद्द केला आहे. साईभक्त हेच आता ब्रँड अँबेसिडर आहेत. त्यामुळे नवीन कोणी ब्रँड अँबेसिडर नेमण्याची गरज नसल्याचे सांगत याबाबतचा प्रस्ताव रद्द केल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: amitabh,sachin,brand,ambasider proposal cancell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.