२०२४ पर्यंत निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल- जयंत पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 03:25 PM2021-01-13T15:25:26+5:302021-01-13T15:26:04+5:30

संगमनेर :  २०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

All work of Nilwande Dam will be completed by 2024 - Jayant Patil | २०२४ पर्यंत निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल- जयंत पाटील  

२०२४ पर्यंत निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल- जयंत पाटील  

Next

संगमनेर :  २०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १३) आयोजित जयंती महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, 
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे संचालक लक्ष्मण कुटे, राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने जेष्ठ पत्रकार  संजय आवटे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना गौरविण्यात आले.

Web Title: All work of Nilwande Dam will be completed by 2024 - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.