शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: 14 वी फेरी : भाजपाचे डॉ.सुजय विखे यांची 1 लाख 54 हजार मतांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 1:35 PM

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर १ लाख ५४ हजार मतांची आघाडी मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी पिछाडीवर पाडले आहे.सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली आहे. चौदाव्या फेरीअखेर १ लाख ५४ हजार ६९७ मतांची आघाडी घेतली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली.चौदाव्या फेरीअखेरीस डॉ.सुजय विखे यांना ३ लाख ८५ हजार ८२१ तर आमदार संग्राम जगताप २ लाख ३१ हजार १२४ मते मिळाली आहेत.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर