After the patient recovers and returns, Agarkar Mala Contentment Zone, citizens' anger | रुग्ण बरे होऊन परतल्यानंतर आगरकर मळा कन्टेन्मेन्ट झोन, नागरिकांचा संताप

रुग्ण बरे होऊन परतल्यानंतर आगरकर मळा कन्टेन्मेन्ट झोन, नागरिकांचा संताप

अहमदनगर: येथील आगरकर मळा परिसरात 10 ते 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळूून आले होते. ते रुग्ण सात दिवसांनी बरे होऊन परतले आहेत. त्यानंंतर रविवारी रात्री आगरकर मळा परिसर प्रतिबंधात्मक क्षत्र जाहिर केले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत. 

दोन हजार लोकवस्ती असलेल्या सागर कॉम्प्लेक्स, अर्बन बँक कॉलनी, झेडपी काॅलनी, आगरकर मळा परिसरातील हा भाग कंटेनमेंट मधे घेऊन  सील केला. दरम्यान हा प्रकार म्हणजे  बैल गेला आणि झोपा केला, असा प्रकार 

असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा भाग सील करताना कुठलाही भौगोलिक रस्त्याच्या रचनेचा काय अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास न करता केला गेला. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनचा जीआर पाहिला असता त्यामधला परिसर आणि प्रत्यक्ष केलेला परिसर याच्यामध्ये बरीच मोठी तफावत दिसून आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. राजकारणी लोकांना मुद्दाम वगळलंमे असा नागरिकांचा आरोप आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये बंदिस्त असलेल्या नागरिकांना  60 रुपये लिटर दूध आणि महागडा  भाजीपाला पत्र्यामधे झुंबड करून घ्यावा लागतो. याच झोनमध्ये जे इमर्जन्सी आरोग्य सेवक राहतात त्यांना स्वतः बाहेर कुठे राहण्याची व्यवस्था करायला सांगितले जाते, हे चुकीचे आहे. हे आरोग्य सेवक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत, अशा वेळेस त्यांनी परत घरी जायचं नाही आणि स्वतः बाहेर राहण्याची व्यवस्था करायची म्हणजे नेमके काय करायचे? तसेच ३-४ कुटुंबांकडे गाई-म्हशी जनावरे आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे,
निव्वळ फोन करून त्यांचा नेहमीचा चाऱ्याला तिथे चारा आणून द्यायला तयार नाही, आणि कर्मचाऱ्यांची कमतरता सांगून एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एकच आउटलेट ठेवलेला आहे. जिथे मनपाचे कर्मचारी उभे राहून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत, ती अतिशय तोकडी पडत आहे.
वास्तविक याचा पुन्हा सर्वे करून खरंच दोन हजार लोकांना बंदिस्त करणे आत्ता आवश्यक आहे का ?हे पाहणे गरजेचे आहे. कारण या परिसरात सापडलेले दहा पंधरा जण केव्हाच बरे होऊन घरी आलेले आहेत.
आणि सागर कॉम्प्लेक्स निश्चितच गजबजलेला परिसर आहे. परंतु झेडपी कॉलनी आणि अर्बन बँक कॉलनी येथे तर स्वतंत्र लांब लांब बंगले आहेत. जीआर प्रमाणे खरा कंटेनमेंट घेऊन विरंगुळा मैदानापासून असूनही
त्यांना याच्यामध्ये का भरडले गेले ते समजत नाही.
या सर्व प्रश्नांवर माननीय जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेब यांनी लक्ष घालून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी  जागृक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

Web Title: After the patient recovers and returns, Agarkar Mala Contentment Zone, citizens' anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.