...अखेर कर्जतमधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 03:14 PM2018-12-21T15:14:40+5:302018-12-21T15:14:57+5:30

कर्जत येथील दावल मालिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणा-या तौसिफ शेख यांचा काल मृत्यू झाला.

After all, he started to take encroachment in Karjat | ...अखेर कर्जतमधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

...अखेर कर्जतमधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

Next

कर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणा-या तौसिफ शेख यांचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर प्रशासन जागे झाले असून आज दुपारी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे.
काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख यांनी आत्मदहन केले. काल रात्रीच उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळपासून कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर देवस्थान परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्यास प्रशासनाने सुुरुवात केली आहे.
आज सकाळपासून कर्जतमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी कर्जतमध्ये आंदोलनकर्ते संतप्त झाले. कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी साजीद पिजारी यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली तर काही आंदोलकांनी दगडफेकही केली. सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास ३ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली. अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 

 

Web Title: After all, he started to take encroachment in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.