शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

परप्रांतीय नागरिकांना मूळ ठिकाणी परतण्‍यासाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 8:55 PM

अहमदनगर - राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे.

अहमदनगर - राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात पदसिध्‍द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केली आहे.अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी  नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची तर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  राज्‍य साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत.त्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहे.

त्यासाठी, साथरोग अधिनियम 1897 अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेली  अधिसूचना व नियमावलीमधील  तरतूदीनुसार व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन  कायदा 2005 अन्‍वये कामकाज करण्‍यासाठी दोन पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

पथक क्रमांक 1 - अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी - नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार ( मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे (मो. 9309881788) व पुनर्वसन शाखा अव्‍वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा  अव्‍वल कारकून  शेखर साळूंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.

लॉकडाऊन मुळे अहमदनगर जिल्‍हयातील इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्‍यक्‍तींना अहमदनगर जिल्‍हयातील वास्‍तवांच्‍या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दतीनुसार Annexure B भरुन घेऊन  कार्यवाही करण्‍यात येणार आहे.  तसेच जिल्‍हयात बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तीची तालुकानिहाय यादी संबंधीत तहसीलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांना कळविणे, अशी जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.

पथक क्रमांक 2- अहमदनगर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील ( मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील  (मो.7020739411), महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते (मो.9403709123), निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्‍वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर  शाखा अव्‍वल कारकून  संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.

लॉकडाऊनमुळे अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये अडकलेल्‍या इतर जिल्‍हयातील व इतर राज्‍यातील व्‍यक्‍तीना  त्‍यांचे वास्‍तव्‍याच्‍या मुळ ठिकाणी पाठविण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती अवलंबून कार्यवाही करण्‍यात येणार आहे. तसेच जिल्‍हयाबाहेर जाणा-या व्‍यक्‍तीची तालुकानिहाय यादी संबंधीत तहसीलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांच्‍याकडून प्राप्‍त करुन घेणे, अशी कामे या पथकाकडे सोपविण्यात आली आहेत. 

 यापूर्वीच्या आदेशात बदल करून अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (भूसंपादन क्रमांक 15 )अजय मोरे यांच्या ऐवजी श्री. पाटील तर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पाटील  यांच्या ऐवजी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.