झिंगाट गाण्यावर थिरकले ८० वर्षांचे आजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:40+5:302021-05-18T04:22:40+5:30

जामखेड : येथील डॉ. आरोळे कोविड सेंटरमधील विलगीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहऱ्यावरील ताणतणाव कमी व्हावा या उद्देशातून येथील समन्वयक सुलताना ...

The 80-year-old grandfather shuddered at the Zingat song | झिंगाट गाण्यावर थिरकले ८० वर्षांचे आजोबा

झिंगाट गाण्यावर थिरकले ८० वर्षांचे आजोबा

Next

जामखेड : येथील डॉ. आरोळे कोविड सेंटरमधील विलगीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहऱ्यावरील ताणतणाव कमी व्हावा या उद्देशातून येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना झिंगाट गाण्यावर नृत्य करण्यास सांगितले. यावेळी एक ८० वर्षांचे आजोबा ही थिरकले.

सध्या मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण आढळत आहेत. काही रूग्ण भीतीने तर काही इंजेक्शन न मिळाल्याने गेले आहेत. अशा परिस्थितीत जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल रूग्णांना जीवदान देणारे ठरत आहे. विनामूल्य रूग्णांची सेवा करणाऱ्या या कोविड सेंटरला अनेक दानशूरांनी मदतीचा हात दिला आहे व मोठ्या प्रमाणावर मदत देखील आली आहे.

येथे केवळ रूग्ण दाखल करून घेतले जात नाहीत, तर त्यांची मानसिकता ही पाहिली जाते. त्यांच्या मनातील कंटाळा, भीती गेली पाहिजे याकडे येथील कर्मचारी लक्ष देतात. रूग्णांची काळजी घेतात. एक प्रकारे रूग्णांचे मनोरंजन झाले तर निश्चितच रुग्ण वेगळ्या विश्वात जातील याच भावनेतून आरोळे हॉस्पिटलमधील समन्वयक सुलताना शेख यांनी सर्व रूग्णांना झिंगाट गाण्यावर नृत्य करण्यास लावले. यावेळी ८० वर्षांचे आजोबांनी नृत्य केले आणि सर्व वातावरणच बदलून गेले. हीच तर खरी संगीतातील जादू आहे.

--

तीन दिवसांपासून अनेक रूग्णांच्या चेहऱ्यावर कंटाळा व भीती दिसत होती. ते मला पाहावले नाही आणि नक्की काय केले पाहिजे हा विचार मनात आला. रूग्णांचे काही तरी मनोरंजन केले पाहिजे असे वाटत होते. तशी जादू आपल्या संगीतात आणि गाण्यात आहे हे उमगले. त्यानंतर गाणे लावले आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच ठेका धरला

-सुलताना शेख,

समन्वयक, आरोळे हॉस्पिटल

---

१७ जामखेड आरोळे

जामखेडच्या आरोळे कोविड सेंटरमध्ये गाण्याच्या तालावर ठेका धरणारे आजोबा.

Web Title: The 80-year-old grandfather shuddered at the Zingat song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.