पाथर्डी तालुक्यात ६०५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:22 AM2021-04-09T04:22:43+5:302021-04-09T04:22:43+5:30

पाथर्डी : पाथर्डी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ...

605 corona active patients in Pathardi taluka | पाथर्डी तालुक्यात ६०५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण

पाथर्डी तालुक्यात ६०५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण

googlenewsNext

पाथर्डी : पाथर्डी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना लसीचा पहिला डोस मिळत नाही. त्यामुळे लसीकरण पुन्हा कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

मिनी लॉकडाऊन असले तरी नागरिक भाजी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक तोंडाला मास्क लावत असले तरी शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. प्रशासन या गोष्टीकडे डोळेझाक करीत आहे.

पाथर्डी तालुक्यात बुधवारपर्यंत ४९१ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यामध्ये गुरुवार दुपारपर्यंत ११४ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ६०५ झाली आहे. ४९१ रुग्णांपैकी मोहटादेवी येथील भक्त निवासात २०४, नवजीवन आश्रमशाळा माळी बाभूळगाव येथे १००, खासगी रुग्णालयात ४४, उपजिल्हा रुग्णालयात ४१ तर १०२ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण भागाची धाकधूक वाढली आहे.

शहरात भरणारा भाजी बाजार बंद केला असला तरी दररोज मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे. त्या ठिकाणी काही विक्रेत्यांच्या तोंडाला मास्क नसते तर काही नागरिकही मास्क वापरीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सुरुवातीला लस घ्यावी की नाही, या मानसिकतेत नागरिक होते; परंतु रुग्ण वाढायला लागल्यापासून लस घ्यायला पाहिजे, अशी मानसिकता आता नागरिकांची झाली आहे.

--

साडेचार हजार जणांचे लसीकरण...

आजपर्यंत पाहिला व दुसरा डोस मिळून एकूण ४ हजार ५२१ नागरिकांनी लसीकरण केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पहिल्या डोसची लस शिल्लक नसल्यामुळे नागरिक परत फिरत आहेत. दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू आहे, अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे यांनी दिली.

---

विनामास्क घराबाहेर पडू नका...

गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण दररोज शंभरी पार करीत असल्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाने कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी नागरिकांकडूनच होत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी केले.

Web Title: 605 corona active patients in Pathardi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.