6 people in contact with Corona were negative; 7 year old Chimurdi from Bodhegaon is also negative | कोरोना बाधिताच्या संपर्कातील ६ जण निगेटिव्ह; बोधेगावातील ७ वर्षीय चिमुरडीही निगेटिव्ह

कोरोना बाधिताच्या संपर्कातील ६ जण निगेटिव्ह; बोधेगावातील ७ वर्षीय चिमुरडीही निगेटिव्ह

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे कल्याणहून एका रात्रीसाठी आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील ५ जणांना तपासणीसाठी गुरूवारी (दि.४ जून) जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तसेच बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी रात्री उशीरा या ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिरानी यांनी दिली. 

 कल्याणहून विनापरवानगी राणेगावात आलेल्या दुसºया ३२ वर्षीय तरूणाचा अहवाल बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच गुरूवारी तहसीलदार अर्चना पागिरे, पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिरानी यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी राणेगावात दाखल झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कोरोनाबाधित तरूणाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन माहिती संकलित करण्यात आली.

 दरम्यान रूग्ण वास्तव्यास असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. घरोघरी जाऊन प्रशासनाने सारी, इली, आरी आजाराबाबात सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. रूग्णाच्या ‘हायरिस्क’ संपर्कात आलेल्या कुटूंबातील ५ जणांना तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते. बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. या ६ जणांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: 6 people in contact with Corona were negative; 7 year old Chimurdi from Bodhegaon is also negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.