श्रीगोंद्यात ११ हजार नागरिक होमक्वारंटाइन; पाच जणांच्या विरोधात गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:15 PM2020-04-01T15:15:29+5:302020-04-01T15:16:29+5:30

कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११  हजार २००  नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत.  त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.  रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 

4,000 citizens home quarantine in Shrigonda; Offense against five | श्रीगोंद्यात ११ हजार नागरिक होमक्वारंटाइन; पाच जणांच्या विरोधात गुन्हा 

श्रीगोंद्यात ११ हजार नागरिक होमक्वारंटाइन; पाच जणांच्या विरोधात गुन्हा 

Next

श्रीगोंदा : कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११  हजार २००  नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत.  त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.  रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 
संचारबंदी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बेलेकर (रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा), अस्लम शेख (रा.साळवणदेवी रोड, श्रीगोंदा), संतोष लोखंडे (रा. वडाळी रोड, श्रीगोंदा), वसंत बनसुडे (रा.बाबुर्डी रोड, श्रीगोंदा), सचिन दरेकर (रा. हिरडगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आता कुणाची गय होणार नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. 
नियंत्रण कक्ष 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधार बेघर नागरिकांना मदत व तक्रारी जाणून प्रशासनाने श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे दोन कर्मचाºयांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली आहे, असेही तहसीलदार महेंद्र महाजन यांनी सांगितले.

Web Title: 4,000 citizens home quarantine in Shrigonda; Offense against five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.