अहमदनगर जिल्ह्यात ३८४ रुग्णांना डिस्चार्ज;  चोवीस तासात नव्या ४८३ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 08:26 PM2020-08-09T20:26:35+5:302020-08-09T20:27:10+5:30

अहमदनगर जिल्ह्यात आज (९आॅगस्ट) ३८४ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली.

384 patients discharged in Ahmednagar district; 483 new patients added in 24 hours | अहमदनगर जिल्ह्यात ३८४ रुग्णांना डिस्चार्ज;  चोवीस तासात नव्या ४८३ रुग्णांची भर

अहमदनगर जिल्ह्यात ३८४ रुग्णांना डिस्चार्ज;  चोवीस तासात नव्या ४८३ रुग्णांची भर

googlenewsNext

अहमदनगर : जिल्ह्यात आज (९आॅगस्ट) ३८४ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार ३६७ इतकी झाली आहे.  

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासा २, शेवगाव १ आणि कोपरगाव २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत रविवारी  २५७ जण बाधित आढळून आले. यामध्ये  संगमनेर ३३,  राहाता २२, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर ६,  कॅन्टोन्मेंट २१,  नेवासा २१, श्रीगोंदा २१, पारनेर ११, अकोले ४, राहुरी १०,  शेवगाव ९, कोपरगाव ४, जामखेड १० आणि कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४७, संगमनेर ९, पाथर्डी  १, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट ४,  नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर २, अकोले २, राहुरी ५, शेवगाव १ आणि कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७२, संगमनेर २३, राहाता ३, पाथर्डी २७, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात १०६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

Web Title: 384 patients discharged in Ahmednagar district; 483 new patients added in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.