शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

‘करोडपती’चे आमिष दाखवून ३५ जणांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:29 AM

कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध टिव्ही शो चा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाचा गैरवापर करून परप्रांतीय गुन्हेगारांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ३५ जणांना आॅनलाईन गंडा घातला आहे़

अहमदनगर: कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध टिव्ही शो चा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाचा गैरवापर करून परप्रांतीय गुन्हेगारांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ३५ जणांना आॅनलाईन गंडा घातला आहे़ फसवणूक झालेल्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत़‘कौन बनेगा करोडपती’ शो च्या माध्यमातून देशभरातील पाच हजार मोबाईल क्रमांकाचा लकी ड्रॉ काढण्यात आला आहे़ या लकी ड्रॉ मध्ये आपला मोबाईल क्रमांकाला २५ लाखांचे बक्षीस लागले आहे़ असे मेसेज मोबाईल धारकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येतात़ मेसेजनंतर कॉल, अ‍ॅडिओ आणि व्हिडिओ क्लिप, विजेत्याच्या नावाने तयार झालेला धनादेश आदी अशा बाबी पाठविल्या जातात़ या मेसेजच्या सत्यत्येची कुठेही पडताळणी न करता नगर जिल्ह्यातील ३५ जणांनी पैशाच्या आमिषापोटी गुन्हेगारांच्या खात्यांवर लाखों रुपयांची रक्कम वर्ग केली़मोबाईलधारकांना २५ लाखांपासून ते ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याचे आमिष हे गुन्हेगार दाखवितात़ मिळालेले पैसे तुमच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी आधी टॅक्स म्हणून १५ ते २५ हजार रुपयांची मागणी केली जाते़ यासाठी बँकेचा खातेक्रमांक पाठविला जातो़ या खात्यावर प्रथम पैसे पाठविल्यानंतर जीएसटीसाठी पुन्हा पैशांची मागणी केली जाते़ हे पैसे पाठविल्यानंतर पुन्हा काहीतरी कारण सांगून पैशांची मागणी केली जाते़ तोपर्यंत आपली फसवणूक झाली आहे ही बाब त्या मोबाईलधारकाच्या लक्षात येते़ अशा पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत़ गुन्हेगारांच्या ज्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यात आले आहेत ती बँक खाते सायबर पोलिसांनी बंद केली आहेत़ मात्र पैसे पाठविल्यानंतर काही क्षणातच ते पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेतले जातात. त्यामुळे यातून गुन्हेगारांचे काही नुकसान होत नाही़ अशा पद्धतीने फसवणूक करणाºया टोळ्यांचे देशभरात रॅकेट आहे़ त्यामुळे तक्रार दाखल झाल्यानंतरही या गुन्हेगारांना शोधून काढणे पोलिसांसाठी मोठे जिकिरीचे ठरत आहे़कसे चालते फसवणुकीचे रॅकेटराजस्थान, झारखंड, दिल्ली अथवा देशाच्या कुठल्याही कानाकोपºयात बसून हे सायबर गुन्हेगार आॅनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवितात़ मोबाईलधारकाला संपर्क करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या सिमकार्डचा वापर केला जातो़ ज्याला पैशाचे आमिष दाखविले जाते त्याच्या चार जण संपर्कात राहतात़ प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क केला जातो़ पहिला कॉल झारखंडमधून आला तर दुसरा कॉल राजस्थानमधून येतो़ ही बाब मोबाईलधारकाच्या लवकर लक्षात येत नाही़प्रथम मोबाईलधारकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्टर स्वरुपात मेसेज येतो या मेजसेवर कौन बनेगा करोडपती या शोचा आणि सोनी टिव्हीचा लोगो तसेच अमिताभ बच्चन यांचा फोटो असतो़ या मेसेजमध्ये आपणाला बक्षीस लागल्याचे सांगितले जाते़ बक्षिसांची रक्कमही दिली जाते़दुसरा मेसेज व्हिडिओ स्वरूपात असतो़ यामध्ये एक तरुणी शोमध्ये (बनावट तयार केलेला कार्यक्रम) अँकरिंग करताना दाखविली जाते़ ज्याला बक्षीस लागल्याचा मेसेज पाठविण्यात आला आहे़ त्याचा मोबाईल क्रमांक स्क्रिनवर दाखवून बक्षिसाची रक्कम सांगितली जाते़तिसरा मेसेज ज्या बँकेत पैसे जमा करावयाचे आहे त्या बँकेच्या अधिकाºयाच्या ओळखपत्राचा असतो़ अर्थात हे ओळखपत्रही बनावट असते़ त्यानंतर ज्यांना अशा स्वरुपाचे पैसे मिळाले आहेत त्या भाग्यवान विजेत्यांच्या मुलाखती़ प्रथम दर्शनी हे मसेज व क्लिप खºया भासतात़ यालाच बळी पडून गुन्हेगारांच्या खात्यावर पैसे भरून या ३५ जणांनी स्वत:ची फसवणूक करून घेतली आहे़टिव्ही शो च्या नावाचा गैरवापर करून लकी ड्रॉ मध्ये बक्षीस लागले आहे असे आमिष दाखवून गुन्हेगार अनेकांची आॅनलाईन फसवणूक करतात़ हे परप्रांतीय गुन्हेगार आहेत़ मोबाईलवर आलेल्या अशा मेसेजला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये़ अथवा कुणाच्या सांगण्यावरून कुठेही पैसे भरू नयेत़ -गोकूळ औताडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस