शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

जामिनावर सुटलेले २६ कैदी झाले फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 5:54 PM

खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेर

अरुण वाघमोडेअहमदनगर : खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेरआल्यानंतर परत कारागृहात परतलेच नाहीत़ यातील बहुतांशी जण पुन्हा गुन्हेगारीकडे वळले आहेत़ २६ पैकी काही आरोपी २० ते २२ वर्षांपासून फरार आहेत.फरार झालेल्या कैद्यांसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस पथकांवर सोपविण्यात आली आहे. हे कैदी मात्र कुणालाच सापडत नाहीत. फरार झालेले कैदी हे येरवडा, पैठण, नाशिक, कोल्हापूर या कारागृहात शिक्षा भोगत होते़ न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर आरोपींना कारागृह प्रशासनाकडून संचित (फर्लो) तर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अभिवचन (पॅरोल) रजा दिली जाते. संचित रजा १४ तर अभिवचन रजा २१ दिवसांची असते़ ही रजा मंजूर करून बाहेर पडल्यानंतर अनेक कैदी कारागृहात जाऊन आपल्या शिक्षेचा कार्यकाल पूर्ण करतात़ गुन्हेगारी प्रवृत्तीचे मात्र फरार होऊन पुन्हा आपल्या कारवाया सुरू करतात़ जिल्ह्यातील फरार झालेल्या २६ पैकी अनेक जण जन्मठेपेची शिक्षा झालेले असून, काही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.हे आहेत फरारगोरक्षनाथ बाबूराव शिंगोटे, रामकिसन उत्तम साठे, सय्यद साजीद रोशनमिया, किरण गोरख शेळके, संतोष बाबूराव सोनवणे, बाबाजी बाबूराव सोनवणे, प्रमोद काळू केंद्रळे, सतीश दिलीप खराडे, शौकात अहमदखान पठाण, उमाजी सुखदेव झांबरे, जितेंद्र सहदेव जगधने, नितीन बबन शिंदे, अंबादास तुकाराम पवार, मंगलसिंग उर्फ मंगेश चतुरसिंग ओनावले, आंबा जगदाळे, शाम केशव मोरे, हबीब सय्यद, चरणसिंग रावसाहेब जाधव, आनंदा रामदास शिरसाठ, सतीश गणपत धिवर, शेख अक्रम, राजेंद्र गणेश धिनोर, शेख एजाज गुलाब, धनू अशोक काळे, रिजवान शेख.पपड्याही सुटला होता पॅरोलवरकोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून एका सराफाचा खून करणारा कुख्यातगुन्हेगार पपड्या काळे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे़ तो नाशिक कारागृहात होता़ मुलाच्या लग्नासाठी मात्र त्याला पॅरोल रजा मंजूर झाल्याने तो जेलबाहेर आला होता़ जामिनावर बाहेरआलेला पपड्या फरार झाला आणि त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या़विविध गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपींना कायदेशीर अधिकारानुसार जामिनावर रजा मंजूर होते़ शिक्षा झालेले काही जण मात्र सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात़ त्यामुळे ते पुन्हा कारागृहात न जाता पसार होतात़ सराईत गुन्हेगारांना रजा मंजूर करताना त्यांची पार्श्वभूमी पाहणे व स्थानिक पोलिसांच्या अहवालाचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते़ एखाद्या सराईत गुन्हेगाराला रजा मंजूर झाली तर पोलिसांच्या निगराणीतच त्याने रजा पूर्ण करण्याची अट घालणे गरजेचे आहे. - रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस