नगर जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:51 PM2020-05-05T16:51:43+5:302020-05-05T16:52:37+5:30

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी (दि.५ मे) पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

20 out of 23 reports in Nagar district are negative | नगर जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटिव्ह

नगर जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटिव्ह

Next

अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी (दि.५ मे) पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
दरम्यान, नेवासा येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. जामखेड येथील ४ तर संगमनेर येथील ३ कोरोनाबाधित व्यक्तींचा १४ दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
 नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह तर दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता मंगळवारी त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटिव्ह आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. संगमनेर येथील ३ आणि जामखेड येथील ४ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
 दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६२८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली आहे. त्यापैकी १५३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ आहे. त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या एकूण १७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: 20 out of 23 reports in Nagar district are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.