जिल्हा रुग्णालयासमोरील गवळीवाड्यात कोरोनाचे 16 रुग्ण, महापालिका सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:19 AM2020-07-08T10:19:20+5:302020-07-08T10:19:20+5:30

अहमदनगर : मंगळवारी दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारी सकाळी पाच, सायंकाळी 16 आणि रात्री 24 असे एकूण 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

16 patients of Corona in Gawaliwada in front of District Hospital, Municipal Vigilance | जिल्हा रुग्णालयासमोरील गवळीवाड्यात कोरोनाचे 16 रुग्ण, महापालिका सतर्क

जिल्हा रुग्णालयासमोरील गवळीवाड्यात कोरोनाचे 16 रुग्ण, महापालिका सतर्क

Next

अहमदनगर : मंगळवारी दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारी सकाळी पाच, सायंकाळी 16 आणि रात्री 24 असे एकूण 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

 

मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा (सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले आहेत. 

यात सर्वाधिक १२ रुग्ण गवळी वाडा येथे आढळले आहेत. 

 गवळीवाडा, कवडेनगर असे मिळून 16 रुग्ण आहेत. 

 

याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या संगमनेर येथील ०२ आणि नगर मनपा आणि राहाता येथील प्रत्येकी एका रुग्णाची आयसीएमआर पोर्टलवर नोंद झाली आहे.  जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

----

जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या:  २२२

बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५

मृत्यू: १८

एकूण नोंद रुग्ण संख्या: ६९५

Web Title: 16 patients of Corona in Gawaliwada in front of District Hospital, Municipal Vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.