उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची साईनगरीतून घरवापसी, तिसरी रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:11 PM2020-05-12T22:11:31+5:302020-05-12T22:11:45+5:30

शिर्डी : रोजगाराच्या निमीत्ताने शिर्डीसह राहाता तालुक्यातील चोवीस गावांत वास्तव्याला असलेल्या उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची आज, मंगळवारी साईनगर रेल्वेस्थानकातुन घरवापसी करण्यात आली़ स्वगृही परतण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावरून ओसंडून वाहत होता़

1559 workers from Uttar Pradesh return home from Sainagari, third train leaves | उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची साईनगरीतून घरवापसी, तिसरी रेल्वे रवाना

उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची साईनगरीतून घरवापसी, तिसरी रेल्वे रवाना

Next

शिर्डी : रोजगाराच्या निमीत्ताने शिर्डीसह राहाता तालुक्यातील चोवीस गावांत वास्तव्याला असलेल्या उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची आज, मंगळवारी साईनगर रेल्वेस्थानकातुन घरवापसी करण्यात आली़ स्वगृही परतण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावरून ओसंडून वाहत होता़
साईनगरीतुन उत्तरप्रदेशला जाणारी ही तीसरी रेल्वे असून या तिन्ही रेल्वे मिळून आतापर्यंत तालुक्यातील ४२१२ नागरीकांना उत्तरप्रदेशात स्वगृही पाठवण्यात आले आहे़
आपल्या कुटूंबातील दुर जाणाºया एखाद्या व्यक्तीला निरोप द्यावा त्या प्रमाणे आपल्या गावी परतणाºया या मजूर बांधवाना साईनगर रेल्वे स्थानकावर रात्री दहाच्या सुमारास निरोप देण्यात आला़ यावेळी साईसंस्थानचे सीईओ अरुण डोंगरे, डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मिना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचारी यावेळी उपस्थीत होते़
रेल्वे निघण्यापुर्वी मजुरांना संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रसादालय कर्मचाºया मार्फत अन्नाची पाकिटे दिली़ यात भाजी, पोळी व मसाले भाताचा समावेश होता़
गेले काही दिवस अत्यंत तणावात काढलेल्या या मजुरांनी रेल्वे निघण्यापुर्वी डोळ्यातील अश्रुंना वाट करून देत प्रशासन व साईसंस्थानला धन्यवाद दिले़  सर्व मजुर उत्तरप्रदेशातील ५४ शहरांतील आहेत़ या सर्वाना सितापुर रेल्वे स्थानकावर सोडण्यात येईल़ या मजुरांना गावी पाठवण्यासाठी तालुका प्रशासना बरोबरच २४ गावातील तलाठी, ग्रामसेवक, ५३ शिक्षक आदींनी परिश्रम घेतले़ मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मीला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला़
---
येथे काम करीत होते मजूर
शिंगवे-४५२, नपावाडी-२११, बाभळेश्वर-५३, नांदुर्खी बु,-२, ममदापुर-३, लोणी खु,-१९, हसनापुर-३२, सावळेविहीर खु,-१, सावळेविहीर बु,-१५, रूई-३७, कोºहाळे- ६, पिंपळवाडी-८०, रांजणखोल-१९, धनगरवाडी-२८, निघोज-२५, कनकुरी-१२, पिंपळस-२०, साकुरी-६८, लोणी बु़-६४, पुणतांबा-२३, कोल्हार बु़-३४, राहाता-९४, निमगाव कोºहाळे ८७ व शिर्डी येथे १७४ मजूर काम करीत होते. हे सर्व मजूर आज रवाना झाले.

Web Title: 1559 workers from Uttar Pradesh return home from Sainagari, third train leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.