जोर्वेत बिबट्याचा बछडा जेरबंद

By Admin | Updated: March 22, 2016 23:53 IST2016-03-22T23:47:55+5:302016-03-22T23:53:47+5:30

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याचा बछडा मंगळवारी पहाटे वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

Zoetch | जोर्वेत बिबट्याचा बछडा जेरबंद

जोर्वेत बिबट्याचा बछडा जेरबंद

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याचा बछडा मंगळवारी पहाटे वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
काही दिवसांपासून जोर्वे परिसरात बिबट्यांनी दहशत माजविली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा बळी गेल्याची घटना १५-२० दिवसांपूर्वी करपडवस्तीवर घडल्याने ग्रामस्थांमध्ये भिती पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शिवराम भवर यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता. दरम्यान, भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्याचा बछडा पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही माहिती समजताच वनक्षेत्रपाल बाबासाहेब काळे, वनपाल डांगे, वनरक्षक चित्ते, ताजणे यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन जेरबंद बिबट्याला निंबाळे रोपवाटिकेत आणले.
(प्रतिनिधी)

Web Title: Zoetch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.